स्टूडियो फोडून ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक

Admin
By -
       




सांगली मधील एक स्टूडियो फोडून ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अटक करून, त्याच्या कडील महागडा कॅमेरा, त्याची लेन्स असा १.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी या  बाबतची दिलेली माहिती अशी की,
        
   दि-३१/०६/२०२४ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सुमित सुर्यवंशी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एक इसम शिवशंभो चौक सांगली येथे चोरीचा कॅमेरा व कँमेरा लेन्स विक्री करणेकरीता येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळालेने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन वॉच केला असता एक इसम बायपास रोड येथे संशयीतरित्या फिरताना मिळुन आल्याने व तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात वरील गुन्हयात चोरीस गेलेला वरील वर्णनाचा व किंमतींचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमालाबाबत त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तरी सदर आरोपीत यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सचीन शिंदे सागंली शहर पोलीस ठाणे हे करित आहेत.