ब्रेकिंग
मतमोजणी प्रक्रियेसाठी महाविकास आघाडी उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच दिला नाही
मतमोजणी प्रकियेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून अद्याप मतमोजणी दरम्यान प्रतिनिधीच दिले नाहीत, या अफवेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मतमोजणीच्या 104 टेबलसाठी प्रतिनिधी द्यायचे होते. मात्र, दिलेल्या वेळेत चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादी शासनाकडे पोहोचलीच नाही. मुदत संपूनही प्रतिनिधी का दिले नाहीत अशी अफवेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे
सुरू असणाऱ्या या चर्चेला संजय बापू विभुते यांनी उत्तर दिलेली आहे
चार जून रोजी सांगली लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार असून सदर मतमोजणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकही काउंटिंग एजंट नेमला नाही अशा पद्धतीची अफवा काही प्रसार माध्यमातून दाखवण्यात येत असल्याची बातमी समजली आणि वाईट वाटलं खरं तर शिवसेनेचे सर्व काउंटिंग एजंट हे नेमलेले असून अधिकृत आयडी शासनाच्या वतीने वितरित केलेले आहेत त्याचा पुरावा म्हणून सोबत एका आयडी चा फोटो पाठवत आहे अशा कोणत्याही बातमीवर किंवा आफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये यासाठी छोटीशी प्रेस नोट मी आपल्या सर्वांना पाठवत आहे शिवसेनेचे सर्व काउंटिंग एजंट हे नेमण्यात आले असून चार तारखेला मतदान केंद्रावर काउंटिंग साठी उपस्थित राहणार आहेत..