खासदार संजयकाका पाटील यांचा उद्या मंगळवारी पहाटे पाच पासून सांगलीत मॉर्निंग वॉक दौरा*

Admin
By -

सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा उद्या मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉक दौरा होणार आहे. सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सजग असणाऱ्या नागरिकांशी संवाद, हास्य क्लब, योगा क्लब, स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी भेट देणार आहेत. 

या दौऱ्यात आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. 

दौऱ्याचा प्रारंभ 

पहाटे ५ वाजता वृत्तपत्र वितरण केंद्र आंबेडकर स्टेडियम सांगली येथून होणार आहे. 
त्यानंतर सकाळी ६ वाजता जोग एरोबिक्स विश्रामबाग, 
सकाळी ६.२० वाजता बापट मळा मंगलमूर्ती कॉलनी सांगली, 
 सकाळी ६.४० वाजता त्रिकोणी बाग, सकाळी 
७ वाजता हनुमान रेस्टॉरंट सांगली जिमखान्या जवळ कॉंग्रेस भवन समोर, 
सकाळी ७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, 
सकाळी ७.४० वाजता आमराई, 
सकाळी ८ वाजता माई घाट स्विमिंग क्लब, 
सकाळी ८.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, 
सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, 
सकाळी ९.२० वाजता गणेश नाष्टा सेंटर विश्रामबाग, 
सकाळी १० वाजता यशवंतनगर सांगली 
असा मॉर्निंग वॉक दौरा असणार आहे.