कणदूरमधील विषबाधेमुळे मृत्यू पावलेल्या व उपचार सुरू असलेल्या गायींच्या गोठ्यांची विराज नाईक यांच्याकडून पाहणी.
कणदूर (ता. शिराळा) येथील शेतकरी अर्णव बाजीराव पाटील यांच्या गोठ्यातील ७ गायींचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. उर्वरित २ गायींची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी भेट देऊन वस्तुस्थितीची माहिती घेत उपचार सुरू असलेल्या गायींची पाहणी केली.
पशुवैद्यकीय अधिकारी सुयशा पाटील यांनी मृत गायींचे शव विच्छेदन करून कशामुळे मृत्यू ओढवला या कारणमीमांसा करावी व योग्य तो अहवाल द्यावा. जेणेकरून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल. उर्वरित गायींवर योग्य ते औषधोपचार करावेत, जेणेकरून त्यांचे प्राण वाचतील. यावेळी त्यांनी विमा कंपनी प्रतिनिधीशीही संपर्क साधला.
घटनास्थळी विष्णू पाटील, बाजार समिती संचालक आनंदा पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, मनोज पाटील, जयदीप पाटील, संभाजी पाटील, महादेव पाटील, सुनील पाटील, गोरख पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते.
